'जय श्रीराम' म्हटल्याची शिक्षा! विद्यार्थ्याला कॉलेजमधून काढले

20 Oct 2023 18:24:12
 JAY SHRI RAM
 
लखनऊ : गाझियाबादच्या एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थांने 'जय श्री राम' असा नारा दिल्यामुळे त्या विद्यार्थ्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एक विद्यार्थी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर खालून काही विद्यार्थी 'जय श्री राम' म्हणतात, त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले विद्यार्थीही 'जय श्री राम' म्हणत त्यांना प्रतिसाद देतो.
 
 
 
यानंतर शिक्षिका डॉ.ममता गौतम स्टेजजवळ पोहोचतात. त्या विद्यार्थ्याला त्याच्या कृत्याबद्दल फटकारण्यास सुरुवात करतात, विद्यार्थ्याने स्पष्टीकरण दिले पण त्यावेळी खालून काही विद्यार्थी राम रामच्या घोषणा देत होते. या सर्व प्रकरणामुळे संतापलेल्या डॉ.ममता गौतम यांनी विद्यार्थ्याला स्टेजवरुन खाली उतरण्यास सांगितले.
 
 
 
या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनीही याप्रकरणी कॉलेज प्रशासनाविरोधात तक्रार दखल केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0