RRC-CR Recruitment 2023: मध्य रेल्वेंतर्गत ६२ पदांसाठी भरती

02 Oct 2023 16:06:11
Central Railway Sports Quota Recruitment 2023

मुंबई
: रेल्वे रिक्रूटमेंट सेल (आरआरसी) अंतर्गत रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर भरती ही स्पोर्टस् कोटाद्वारे होणार आहे. दरम्यान, २०२३-२४ या वर्षासाठी मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील क्रीडा कोट्यातील भरतीसाठी इच्छुक अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्जदार त्यांचे अर्ज मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर सबमिट करू शकतात.
सदर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर असणार आहे.
पुढील पदांकरिता अर्ज मागविले जात आहेत.

लेव्हल ५/४: ५ पदे
लेव्हल ३/२: १६ पदे
लेव्हल १ : ४१ पदे
 
तसेच, उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून इयत्ता १०वी/इयत्ता १२वी उत्तीर्ण केलेली असावी. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 
Powered By Sangraha 9.0