बंगलोर : कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून कट्टरपंथीयांच्या उपद्रवामध्ये वाढ झाली आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२३ रोजी ईद मिलाद मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली आहे अनेक वाहने आणि घरांनाही लक्ष्य करण्यात आले. या मिरवणुकीची व्हायरल झालेली छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये अखंड भारताचा नकाशा हिरव्या रंगाने रंगवण्यात आला असून त्यावर मुघल शासक औरंगजेबाचे चित्र छापण्यात आले आहे. इस्लामिक शासक टिपू सुलतान आणि त्याच्या तलवारीचे कटआउट देखील प्रदर्शनात होते.
या संदर्भात भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यातील सिद्धरामय्या सरकारला 'तुघलक सरकार' म्हणत केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी ट्विट करत सिद्धरामय्या सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, "काँग्रेस सरकारने कट्टरपंथीयांना तलवारी घेऊन मिरवणूक काढण्याची परवानगी का दिली? त्यांचा खरा हेतू काय आहे? सरकारने कर्नाटक पोलिसांचे हात का बांधले?"
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंसक मिरवणुकीदरम्यान शिवमोग्गा येथील राणीगुड्डा भागातील शांती नगरमध्ये अचानक दगडफेक सुरू झाली. यानंतर तणाव पसरला. दोन्ही पक्ष आमनेसामने आले. दगडफेकीत सहा जण जखमी झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला. या परिसरात जलद कृती दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.
वृत्तानुसार, वादाचे मूळ टिपू सुलतानचे वादग्रस्त कटआउट आहे. कटआउटमध्ये टिपूने दक्षिण भारतातील एका हिंदू योद्ध्याला मारल्याचे चित्रण होते. या चित्रावर एका मुस्लिम तरुणाने स्वतःच्या रक्ताने शेर टिपू लिहिले होते. या कटआउटवर हिंदू संघटनांनी आक्षेप नोंदवला. कट्टरपंथीयांनी केलेल्या दगडफेकीत अनेक घरांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे.
मिरवणुकीत टिपू सुलतानच्या तलवार कमानीची झांकी काढण्यात आली. ही तलवार यंत्राच्या साहाय्याने चहूबाजूंनी फिरवली जात होती. तलवारीच्या काठावर रक्ताचे प्रतीक म्हणून लाल चिन्ह दाखवण्यात आले होते. याशिवाय मिरवणुकीच्या एका प्रवेशद्वारावर अखंड भारताचे कटआऊट हिरव्या रंगात रंगवण्यात आले होते. नकाशाच्या मध्यभागी औरंगजेबाचा फोटो लावला होता. गेटच्या खांबावर औरंगजेबही दाखवला होता. औरंगजेबाच्या फोटोखाली इंग्रजीत मुस्लिम साम्राज्य लिहिले होते. तसेच शिवमोगा शहरात टिपूच्या तलवारीचे होर्डिंग्ज लावण्यात आले होते.