सावधान! मुंबईवर घोंघावतंय "तेज" चक्रीवादळाचे संकट

18 Oct 2023 16:32:58
Tej Cyclone in-arabian-sea-alert-in-mumbai
 
मुंबई : राज्यभरात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. मात्र मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचे श्रेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता अरबी समुद्रात तयार झालेल्या "तेज" चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे मुंबई शहरास धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी "तेज" चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असून मुंबई शहर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 
दरम्यान, या चक्रीवादळामुळे शहरातील हवामानावर परिणाम होणार असून वेगाने वारे आणि मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून मुंबईतील नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरिन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचे ढग तयार होत आहेत. देशाच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर चक्रीवादळं निर्माण झाल्यास ते पुढील ९ दिवसांमध्ये धडक देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0