कोकण रेल्वेने गाठला ५ हजार कोटींचा टप्पा!

18 Oct 2023 13:07:14
 kokan railway

नवी मुंबई : ‘झुक झुक झुक आगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढत’ कोकण रेल्वे स्थापनेला ३३ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोकण रेल्वेने प्रथमच ५१५२.२३ कोटींचा महसुली उत्पन्न टप्पा गाढला आहे. २७८.९३ कोटी निव्वळ नफा मिळाला असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले.

कोकण रेल्वेने ३३ वर्षांच्या समर्पित प्रवासास यावर्षी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. राष्ट्रीय सेवा आणि २५ वर्षे अखंड ऑपरेशन्स, हा क्षण साजरा करण्यासाठी ‘सिडको’च्या प्रदर्शन व ‘कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये ३३ व्या स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिताना संबोधित करताना अध्यक्ष गुफ्ता यांनी सर्व कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक केले.

गेल्या १२-१८ महिन्यांत, गोवा-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसल हिरवा झेंडा दाखवला. दि. २७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. दि. २६ मार्च रोजी नव्याने पूर्ण झालेल्या आयकॉनिक चिनाब पुलाची रेल्वे मंत्र्यांनी पाहणी केली, अशी माहिती गुफ्ता यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0