महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू, आजच अर्ज करा

17 Oct 2023 19:20:24
Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2023

मुंबई :
"महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड" अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने प्रशिक्षणार्थी लिपिक आणि इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम  मुदत दि. ३० ऑक्टोबर २०२३ असणार आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीद्वारे एकूण १५३ पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड एकूण रिक्त जागा पुढीलप्रमाणे आहे. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ४५ जागा, प्रशिक्षणार्थी लिपिक १०७ जागा १०७ जागा, कनिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये स्टेनो टायपिस्ट १ जागा या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

तसेच, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि लघुलेखक टंकलेखक यांच्या अर्जाची फी १ हजार ७७० रुपये तर, प्रशिक्षणार्थी लिपिकासाठी अर्ज शुल्क १ हजार १८० रुपये असेल. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0