भारतीय विमानतळ प्राधिकरणात ४९६ रिक्त जागांची भरती; लवकरच अर्जप्रक्रिया सुरू होणार

17 Oct 2023 17:17:55
Air Traffic Control AAI Recruitment 2023

मुंबई :
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरती केली जाणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून दि. ०१ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्राफिक कंट्रोल) या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून अंतिम मुदत दि. ३० नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

तसेच, या पदांच्या आवश्यकतेनुसार, उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. या भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 
Powered By Sangraha 9.0