NCLAT च्या वतीने दीपक छाब्रिया यांची फिनोलेक्स केबल्स लिमिटेडच्या चेअरमनपदी फेरनियुक्ती
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) या नवी दिल्ली येथील प्रमुख खंडपीठाने दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी दीपक छाब्रिया यांच्या बाजूने निकाल देत त्यांना फिनोलेक्स केबल्सचे चेअरमन म्हणून काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मे 2019 च्या एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग (EGM), तसेच फिनोलेक्स केबल्स आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्यातील ट्रस्ट डीड आणि सामंजस्य कराराच्या आधारे दीपक छाब्रिया चेअरमन म्हणून कायम राहतील अशी पुष्टी या निर्णयाने केली आहे.
NCLAT आदेशात नमूद केल्याप्रमाणे मे 2019 मध्ये झालेल्या EGM आणि त्या बैठकीत पारित झालेल्या ठरावांवर कंपनी याचिका 47/2016 च्या ऑर्बिटमधील शेअर्सच्या मालकीचा अंतीम निर्णय होईपर्यंत कार्यवाही केली जाऊ नये. ऑर्बिट इलेक्ट्रिकल्समधील काही लेखांमध्ये सुधारणा आणि हटवल्याने दीपक छाब्रिया यांना संभाव्य हानी पोहोचू शकते आणि फिनोलेक्स केबल्सचे चेअरमन म्हणून त्यांचे स्थान बाधित होऊ शकते, असेही या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
आदेशात म्हटले आहे की, “आर्टिकल्स ऑफ असोसिएशन अनुसार दीपक किशन छाब्रिया हे फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे चेअरमन म्हणून काम पाहू शकतात. कारण ते 3.5.2019 च्या EGM, ट्रस्ट डीड आणि FCL आणि FIL यांच्यात झालेल्या सामंजस्य करारापूर्वी देखील काम पाहत होते. अनुक्रमे कलम 59 आणि 60 मधील सुधारणा आणि काही भाग रद्द केल्याने दीपक छाब्रिया यांच्या विरोधात केवळ सोयींचा समतोल ढासळणार नाही तर त्यांना FCL चेअरमन म्हणून पदावरून काढून टाकल्याने त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते. त्यांना फिनोलेक्स केबल्स लिमिटेडच्या व्यवस्थापनातून बाहेर ढकलून संपूर्ण परिस्थिती बदलण्याची क्षमता ऑर्बिट इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सुधारित आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये आहे.”