मुंबई : आर्थिक गुन्हे शाखा, ईडीच्या तपासानंतर आता आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. कोविड काळातील बीएमसीकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या संपूर्ण प्रकारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे.
किरीट सोमय्या ट्विट करत म्हणाले, "बीएमसी कंत्राटदारांवर आयकर विभागाचे महाराष्ट्र,गुजरात,UP छापे. ऑक्सिजन प्लांट्स, कोविड हॉस्पिटल्सची घोटाळा." अशी माहिती सोमय्यांनी फोटो शेअर करत दिली आहे.