सोलापूर शहरातील राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

    16-Oct-2023
Total Views |
chandrakant patil

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांचे सोलापूर शहरात आगमन झाले. सोमवार दि. १६ रोजी रोजी शासकीय कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी रविवारी सायंकाळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद हुतात्मा किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री श्री. पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. यावेळी श्री. नरेंद्र काळे, श्री. मोहन डांगरे, श्री. अनंत जाधव, श्री विक्रम देशमुख हे पदाधिकारी उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री पाटील यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुस्तक भेट देऊन स्वागत केले. तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख व आमदार समाधान आवताडे तसेच मान्यवर व्यक्तींनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांना दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले, त्या निवेदनावर संबंधित विभागाकडून तात्काळ कार्यवाही होऊन आपले काम मार्गी लागेल असे पाटील यांनी आश्वासित केले. त्याप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अन्य नागरिकांचे व पदाधिकाऱ्यांची निवेदने स्वीकारून त्यावर प्रशासनाकडून उचित कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत ..

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..