सोलापूर शहरातील राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

16 Oct 2023 16:48:40
chandrakant patil

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांचे सोलापूर शहरात आगमन झाले. सोमवार दि. १६ रोजी रोजी शासकीय कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी रविवारी सायंकाळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद हुतात्मा किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री श्री. पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. यावेळी श्री. नरेंद्र काळे, श्री. मोहन डांगरे, श्री. अनंत जाधव, श्री विक्रम देशमुख हे पदाधिकारी उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री पाटील यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुस्तक भेट देऊन स्वागत केले. तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख व आमदार समाधान आवताडे तसेच मान्यवर व्यक्तींनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांना दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले, त्या निवेदनावर संबंधित विभागाकडून तात्काळ कार्यवाही होऊन आपले काम मार्गी लागेल असे पाटील यांनी आश्वासित केले. त्याप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अन्य नागरिकांचे व पदाधिकाऱ्यांची निवेदने स्वीकारून त्यावर प्रशासनाकडून उचित कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0