बाळासाहेबांच्या सुपुत्राने काय करुन दाखवलं?

16 Oct 2023 14:33:41
 
thackeray
 
 
मुंबई : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं? असा सवालच भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षाशी युती केली. बाळासाहेबांनी कायम ज्या पक्षांना आपला विरोध दर्शवला त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली. त्यामुळे आशिष शेलार यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे.
 
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, "हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं...? शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं. श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले. राम मंदिरावर टीका करुन दाखवली. हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले. छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले. वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं."
 
 
" "गर्व से कहो हम हिंदू हैं" म्हणणारी शिवसेना आता.. "गर्व से कहों हम समाजवादी हैं" म्हणू लागली..! भविष्यात कदाचित "गर्व से कहो हम MIM हैं" सुध्दा म्हणू लागतील!!" असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी ठाकरेंवर केला आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0