मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर! 'या' स्थानकांदरम्यान उभारणार नवीन स्थानक!

13 Oct 2023 15:02:20

railway station

मुंबई :
मध्य रेल्वे मुंबईच्या बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. याकरता गेल्या ८ वर्षांपासून प्रवासी मागणी करत होते. ११ ऑक्टोबरला प्रवाशांच्या मागणीला यश आले असून मध्य रेल्वेकडून स्थानक उभारणीला सुरुवात झाली आहे.

बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे स्थानका दरम्यान सात किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे मध्यावर राहणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागते. यासाठी प्रवाशांनी मध्यभागी चिखलोली स्थानक उभारावे याची मागणी केली होती. हे रेल्वे स्थानक अंबरनाथ स्थानकापासून ४.३४ किलोमीटर आहे. तर, बदलापूर स्थानकापासून ३.१ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पाकरता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ८१.९३ कोटींचा निविदा मंजुर केला आहे.

तसेच, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या मार्गावर लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय गाड्या वेगवेगळ्या मार्गाने धावतील. या कामासाठीदेखील कोटींचा निविदा देण्यात येणार आहे. निविदा मंजुर झाल्यामुळे कामाला वेग येऊन पुढील २ वर्षात ही कामे पुर्ण होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Powered By Sangraha 9.0