पोपट, शेकरु पिंजराबंद ठेवणाऱ्याला अटक

11 Oct 2023 18:54:49



forest department


मुंबई (विशेष प्रतिनिधी): सावंतवाडी माठेवाड रोड येथील रहिवाशाच्या घरुन पोपट आणि शेकरु पिंजराबंद ठेवलेले आढळले. या प्रकरणी वनविभागाने कारवाई केली असुन एका इसमाला अटक करण्यात आली आहे.


संरक्षित प्राणी अवैधरित्या पिंजराबंद ठेवल्याची गुप्त माहिती वनविभागाला समजली होती. या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या घरी तपासणी केली असता पोपट आणि शेकरू यांना पिंजराबंद ठेवल्याचे निदर्शनास आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये संरक्षित प्राण्यांना घरात पिंजराबंद ठेवणे हा गुन्हा असुन या कायद्यानुसारच सावंतवाडीमधील कैस अब्दुल लतीफ बेग यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल- प्रमोद राणे, प्रमोद जगताप, पोलिस कॉन्स्टेबल गौरेश राणे, वनरक्षक महादेव गेजगे, दत्तात्रय शिंदे, प्रकाश रानगिरे, सागर भोजने, वैशाली वाघमारे, चालक नितीन यांनी केली आहे.




Powered By Sangraha 9.0