नागपुर : येत्या काही दिवसांतच नवरात्रोत्सव सुरु होणार आहे. नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याची सर्वत्र जोरात तयारी सुरू आहे. नागपुर शहरात माता जगदंबेची मूर्ती (मुखवटा ) खोदकामात सापडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे देवीच्या मुखवट्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
जमिनीतून मुखवटा वर आल्याचा व्हायरल व्हिडीओतून दावा करण्यात येत आहे. मंगळवारी (१० ऑक्टो.) हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. ही घटना नागपुरच्या समतानगरमधील आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने जमण्यास सुरूवात केली आहे. दंगल नियंत्रण पथक, पोलिस पथक ही घटनास्थळी तैनात करण्यात आलं आहे. तर, लोकांनी पुजा करण्यास सुरवात केली आहे.