कुर्ला भाभा रुग्णालयातील कंत्राटदारास दंडात्मक कारवाई करण्याबाबत आश्वासन

    11-Oct-2023
Total Views |
bhabha hospital

कुर्ला :
कुर्ला पश्चिम येथील खान बहादुर भाभा रुग्णालय येथील अव्यवस्थाबाबत वैद्यकीय अधीक्षक ( प्रभारी ) पद्मश्री अहिरे यांस निवेदन देण्यात आले. करार संपुष्टात आला नसतानाही सेवा न देणाऱ्या मेसर्स मल्लिका प्रॉपर्टीज प्रा. लि या कंपनीला काळया यादीत टाकत दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

कुर्ला पश्चिम येथील खान बहादुर भाभा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक ( प्रभारी ) पद्मश्री अहिरे यांची भेट आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, मनोज राजन नाथानी आणि चेतन कोरगांवकर यांनी घेत लेखी निवेदन दिले. सुविधा आणि वेळेत उपचार न मिळाल्याने संभाव्य दुर्घटना टाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. खाजगी तत्त्वावर सुरु असलेले अतिदक्षता विभाग 100 टक्के संचालित करणे. करार संपुष्टात आला नसतानाही सेवा न देणाऱ्या मेसर्स मल्लिका प्रॉपर्टीज प्रा. लि या कंपनीला काळया यादीत टाकणे आणि दंडात्मक कारवाई करणे. रूग्णवाहिका पूर्णपणे क्षमतेने संचालित करणे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक पद भरणे. औषध आणि अन्य साम्रगी याचा साठा उपलब्ध करणे. अश्या प्रमुख मागण्या होत्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.