भिवंडीत ५५ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत

11 Oct 2023 17:42:01

thane

ठाणे :
महाराष्ट्रात विक्रिस परवानगी नसलेला ५५ लाखांचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडी येथे जप्त केला आहे.याप्रकरणी, रमेंद्रकुमार रमाकांत तिवारी (४८), रा. शेलारगाव, भिवंडी, आणि रियाज अली आबिद (५५), रा. म्हाडा कॉलनी,भिवंडी यांना अटक करुन गोदामातील परदेशी वाईनच्या ७५० मिलीच्या एकुण ५२८८ बाटल्या जप्त करण्यात आला.

भिवंडी येथील वाडा रोडवरील अनगाव येथील ध्वानी कॉम्प्लेक्स, शॉप नं. २०४, २०५ व २०६ येथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा करून ठेवण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच मंगळवारी भरारी पथकाने छापा मारून ५५ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे व विजय धुमाळ यांच्या पथकाने केली.

Powered By Sangraha 9.0