काँग्रेस हे डूबते जहाज : चंद्रशेखर बावनकुळे

22 Jan 2023 17:17:01
handrasekhar Bawankule



बुलढाणा
: भाजपची मानसिकता दुसऱ्यांची घरे फोडण्याची आहे, असे विधान काँग्रस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते.त्या विधानाला प्रत्युत्तर देताना बुलढाणा येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ,काँग्रेस हे डूबते जहाज आहे.तसेच काँग्रेसच्या डूबत्या जहाजात बसायला कोणीही तयार नाही. काँग्रेसचे कार्यकर्तेचं त्याच्या जहाजातून उडी मारत असल्याचा टोला ही बावनकुळे यांनी लगावला आहे.

भाजपाची घरे खूप पक्की आहेत. मविआ सरकारच्या काळात भाजपाला फोडण्याचा प्रयत्न झाला पण त्यात मविआला यश आले नाही. त्याचबरोबर देंवेद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृवात भाजपाच्या संघर्षाच्या काळात ही एक ही कार्यकर्ता आम्हाला सोडून गेला नाही. अडीज वर्ष भाजप फोडण्याचे बरेच प्रयत्न झाले. पंरतू तसं न होता राज्यसभा , विधानपरिषद , नागपूर पदवीधर निवडणूकीत महाविकास आघाडीचेचं उमेदवार फुटले. त्यामुळे काँग्रेस हे डूबते जहाज आहे हे सर्वाना कळलेले आहे, असा टोला ही बावनकुळे यांनी लगावला . तसेच नाना पटोलेंनी आपला पक्ष साभांळावा, असा सल्ला ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंना दिला.


Powered By Sangraha 9.0