'व्हेलेंटाईन डे'ला सरकार कोसळणार : नाना पटोले

    21-Jan-2023
Total Views |
नाना पटोले


अकोला
: काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रतील सरकार कोसळणार असल्याचा जावईशोध लावला आहे. नाना पटोलेंनी अकोला येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारसभेत असताना हे वक्तव्य केले आहे. तसेच फडणवीस-शिंदे सरकार हे असंविधानिक सरकार आहे, असे ही नाना पटोले म्हणाले आहेत.तर पटोलेंच्या विधानाला सहमती दर्शवत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीस-शिंदे सरकार १९ फेब्रुवारी पर्यंत ही टिकणार नाही,असे विधान केले आहे.


एकीकडे शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यांच पार्श्वभूमीवर पटोलेंनी हे विधान केल्यामुळे नव्या चर्चानां तोंड फुटले आहे. तसेच शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल १४ फेब्रुवारीला होणार आहे.त्यामुळे तेव्हा हे सरकार कोसळणारचं,असा नवा जावईशोध नाना पटोलेंनी लावला आहे.