निष्पाप मुलींचे शोषण करणारा जिहाद थांबायलाच हवा : योगिता साळवी

20 Jan 2023 13:35:52

लव्ह जिहाद
पेण : पेणमध्ये दि. १९ जानेवारी रोजी ‘पेण एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘अहिल्या महिला मंडळ येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माझं शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी सभेला अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. यावेळी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी या प्रमुख वक्ता होत्या.


दोन्ही ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ” प्रेमाच्या फसव्या नाटकाआड निष्पाप मुलींचे शोषण करणारा जिहाद थांबायलाच हवा.” ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय? त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याचे वर्तमानकाळातले स्वरूप आणि भविष्यातील पडसाद यावर त्यांनी विश्लेषण केले. तसेच उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ’लव्ह जिहाद’विरोधी कायदा निर्माण व्हावा, ही भूमिका विशद करताना देशभरातील ’लव्ह जिहाद’ विरोध संदर्भातील कायदे स्पष्ट केले. पेण एज्यूकेशन सोसासयटीच्या सभेमध्ये संस्थेचे मानस सचिव बाळासाहेब जोशी ,रायगड वैश्यवाणी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र झिंजे, ज्युनिअर महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली जोशी, डॉ. जगदीश केसकर, गोरक्षक मंगला पाटील, उदय माकडे, विद्या साळुंखे, गणेशन वसंत कराड उपस्थित होते. यावेळी रवींद्र झिंजे यांनी सभेचे प्रास्ताविक केले, तर अंजली जोशी यांनी सभेचे विवेचन केले.
पेणमधील दुसरी सभा अहिल्या महिला मंडळ येथे झाली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थेच्या संस्थापिका वासंती देव यांची होती. अहिल्या महिला मंडळाच्या सर्वच मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

यासभांचे समन्वय दै. ‘मुंबई तरूण भारत’चे स्थानिक प्रतिनिधी आनंद जाधव यांनी केले होते. या दोन्ही सभांनतर श्रोत्यांनी ’लव्ह जिहाद’संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना वक्त्यांनी पुराव्यासकट उत्तर दिली. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उपस्थित श्रोत्यांनी निर्धार केला की माझे पेण शहर ‘लव्ह जिहाद’मुक्त शहर करणार

सामाजिक समस्यांवर शिक्षकांशी संवाद


महाराष्ट्र शिक्षण संस्था पेणचे विद्यामंदिर येथे शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. सद्यस्थितीत समाजासमोरचे प्रश्न आणि शिक्षक तसेच जागरूक नागरीक म्हणून आपली भूमिका या विषयावर योगिता साळवी यांनी शिक्षकांशी संवाद साधला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्यासह शाळेतील सर्वच शिक्षक उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0