हिंदू नेत्यांची माहिती पाठवायचा 'हिट स्क्वॉड्स'ला 'पीएफआय'च्या रिपोर्टरला अटक

19 Jan 2023 16:48:53

पीएफआय
 
 
केरळ : बिगर मुस्लीम नेत्यांची माहिती घेऊन 'हिट स्क्वॉड्स'ला पाठविणाऱ्या 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'चा कार्यकर्ता मोहम्मद सादिकला एनआयएने अटक केली आहे. पीएफआयसाठी तो 'रिपोर्टर' म्हणून कार्यरत होता. १८ जानेवारीच्या मध्यरात्री त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) ताब्यात घेतले. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात पथकाने छापेमारी केली होती. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.

कोल्लम जिल्ह्यतील बिगर मुस्लीम नेत्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश 'पीएफआय'तर्फे मोहम्मद सादिकला देण्यात आले होते. ‘हिट स्क्वॉड’कडे ही माहिती सोपवण्यात येत होती. त्याच्याकडून कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि इतर पुरावे जप्त करण्यात आल्याचे एनआयएने सांगितले आहेत. आरोपी मोहम्मद सादिकला पीएफआयसाठी 'रिपोर्टर' म्हणून काम पाहत होता. या प्रकरणात ९ सप्टेंबर २०२२ रोजी एनआयएच्या कोची पथकाने या प्रकरणाची दखल घेतली होती.

तरुणांचे 'ब्रेन वॉशिंग'!
मोहम्मदच्या तपासात तो हिट स्क्वॉडसाठी कार्यरत असल्याचे समजले आहेत. तसेच. लष्कर-ए-तोयबा (एलईटी), इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) आणि इतर दहशतवादी संघटनांमध्ये सक्रीय होण्यासाठी तरुणांचे ब्रेनवॉश करत असल्याचेही सादीकवर आरोप आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0