भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच ‘आयएनएस विशाल’ विमानवाहू युद्धनौका

    05-Sep-2022
Total Views |
INS VISHAL
 
 
नवी दिल्ली : गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘आयएनएस विक्रांत’ या भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. त्यानंतर आता भारताची दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका म्हणजेच ‘आयएनएस विशाल’ची चर्चा सुरू झाली आहे.‘आयएनएस विशाल’ भारताची तिसरी विमानवाहू युद्धनौका असेल. त्याआधी भारताकडे ‘आयएनएस विक्रमादित्य’ आणि ‘आयएनएस विशाल’ या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. ‘आयएनएस विशाल’ भारताची दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका असेल. ‘आयएनएस विशाल’ची बांधणीदेखील भारतीय नौदलाच्या ‘कोची शिपयार्ड लिमिटेड’मध्ये केली जाईल.
 
‘आयएनएस विशाल’चे वजन ६५ हजार टन इतके असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आयएनएस विशाल’ भारताची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका ठरेल. कारण, ‘आयएनएस विक्रमादित्य’ आणि ‘आयएनएस विक्रांत’चे वजन ४५ हजार टनांच्या आसपास आहे. ‘आयएनएस विशाल’वर ५५ लढाऊ विमाने तैनात करण्याची क्षमता असेल. याऊलट ‘आयएनएस विक्रांत’वर ३०च्या आसपास लढाऊ विमाने तैनात राहण्याची शक्यता आहे.‘आयएनएस विशाल’ची चर्चा जवळपास एका दशकापूर्वी सुरू झाली होती. प्रारंभी ती २०२० पर्यंत नौदलात समाविष्ट होण्याची अपेक्षा होती. पण अनेक कारणांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विलंब झाला.
 
२०१८मध्ये नौदलाने या युद्धनौकेची २०२१पर्यंत बांधणी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आता ती २०३०पर्यंत नौदलाच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. भारताला सागरी सुरक्षेसाठी विमानवाहू युद्धनौकांची नितांत आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत भारतालगतच्या सागरी क्षेत्रात विशेषतः हिंदी महासागरात चीनचा वावर वाढला आहे. त्यामुळे भारतासाठी विमानावाहू युद्धनौकेचे महत्त्व फार वाढले आहे.आतापर्यंत चीनकडे ‘लिओनिंग’ व ‘शेडोंग’ नामक दोन विमानवाहू युद्धनौका होत्या. पण गेल्या जून महिन्यात चीनच्या ताफ्यात ‘फुजिआन’ ही तिसरी विमानवाहू युद्धनौका समाविष्ट झाली. ‘फुजिआन’ ही चीननिर्मित उअढजइएठ तंत्रज्ञानाने सुसज्ज चीनची पहिली स्वदेशी युद्धनौका आहे.
 
‘आयएनएस विक्रमादित्य’ व ‘आयएनएस विक्रांत’ या पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या दोन विमानवाहू युद्धनौकांच्या तुलनेत ‘आयएनएस विशाल’वरील विमानांच्या लॉन्च पॅडमध्ये मोठा फरक असेल. ‘विक्रमादित्य’ व ’विक्रांत’चे डेक थोडेसे वर उठलेले आहेत. याउलट ‘आयएनएस विशाल’चा डेक सपाट असेल. ‘आयएनएस विशाल’मध्ये प्लेनचे ’टेक ऑफ’ व ‘लॅण्डिंग’साठी उअढजइएठ प्रक्षेपण प्रणाली वापरली जाईल. ‘विक्रांत’ व ’विक्रमादित्य’मध्ये विमानाच्या ’टेक ऑफ’ व ‘लॅण्डिंग’साठी डढजइअठ लॉन्च प्रणाली वापरली जाते. कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेचा रन-वे सामान्य विमानतळाच्या धावपट्टीपेक्षा खूपच लहान असते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.