अदानी समूह करणार १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

29 Sep 2022 14:36:53
adani
 
 
 
नवी दिल्ली : देशातील आघाडीचा उद्योगसमूह असलेला अदानी उद्योगसमूह येत्या १० वर्षात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा अध्यक्ष गौतम अदानी यांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या सिंगापूर येथील फोर्ब्स ग्लोबल सीईओ परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यापैकी ७० टक्क्यांहून जास्त गुंतवणूक ही हरित ऊर्जा संक्रमणासाठी केली जाणार आहे. याच बरोबर देशात हरित आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा स्रोतांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये ही गुंतवणूक केली जाईल.
 
 
"आम्ही आमच्या समूहाकडून येत्या १० वर्षात १०० डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत. यामधील ७० टक्क्यांहून जास्त गुंतवणूक हरित ऊर्जेमध्ये करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. तसेच याच बरोबरीने हायड्रोजन वर आधारित मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यासाठीही आम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक करू" असे म्हणत आपल्या या गुंतवणुकीची पुढील रूपरेषा अदानी यांनी स्पष्ट केली. याच बरोबरीने हरित ऊर्जा क्षेत्रात निर्यातदार म्हणूनही ओळख प्रस्थाची करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
भारतात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्यातूनच भारताचा खरा विकास होणार आहे. अपारंपरिक ऊर्जास्रोत हे भारताच्या विकासाचा राजमार्ग खुला करतील आणि यातून भारतीय तरुणांसाठी रोजगारांच्या असंख्य संधी निर्माण देखील होतील त्यामुळे भारताने या क्षेत्राकडे लक्ष देणे आणि जाणीवपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे असे मत अदानी यांनी नोंदवले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0