उत्तरप्रदेशच्या पर्यटन विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार! योगींचा महत्वाकांक्षी प्रकल्प

20 Sep 2022 15:33:39

yogi 
 
 
लखनऊ : योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशाचा झपाट्याने विकास होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी योगींनी एक पंचवार्षिक धोरण आखले आहे. या धोरणातून उत्तरप्रदेश मधील पर्यटन क्षेत्रात तब्बल १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. उत्तरप्रदेशच्या सर्वांगीण विकासामध्ये याचा मोठा वाटा असणार आहे. उत्तरप्रदेशला २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठीच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे उत्तरप्रदेशचे पर्यटन मुख्य सचिव मुकेश कुमार यांनी सांगितले.
 
 
राज्यात सर्वच क्षेत्रांत गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने योगी सरकार पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून रस्ते बांधणी, तसेच उद्योगधंद्यांनी राज्यात यावे यासाठी इंडस्ट्रियल कोररिडॉरची निर्मिती यांसारख्या प्रकल्पांना गती देण्यास सुरुवात केली आहे. तसेच फक्त हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी २०० कोटींची गुंतवणूक योगी सरकारने केली आहे. याच माध्यमातून राज्यात पायाभूत सुविधांचा विकास करून राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे. याशिवाय स्वतः मुख्यमंत्री योगी उत्तरप्रदेशमधील पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी विशेष मोहीम आखणार आहेत.
 
 
राज्यातील सध्याचे विकासाचे धोरण हे अधिक कालसुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देऊन, राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला उत्तेजन देणे हाही यामागचा उद्देश आहे. देशातील सर्वात जास्त खेड्यांची संख्या ही उत्तरप्रदेश मध्ये आहे त्यामुळे यासाठी खास समिती स्थापन करून त्यातून या खेड्यांच्या विकासासाठी योजना निर्माण करण्यात येणार आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0