रुपया होणार आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत चलन!

20 Sep 2022 11:37:27
 
cuba
 
 
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ३ ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही मोठा झाला आहे. ब्रिटनला मागे टाकत आता भारताने ही झेप घेतली. जागतिक स्तरावर आपले स्थान भक्कम कारण्याबरोबरच भारताने अजून मोठी उंची गाठण्याकडे दमदार वाटचाल सुरु केली आहे. भारतीय चलन रुपयाला जगातील प्रमुख चलनांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने भारताने वाटचाल सुरु केली आहे. नुकतीच क्युबा या देशासोबत रुपयांमध्ये सर्व व्यवहार रुपयांमध्ये करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. क्युबाच्या शिष्टमंडळाने भारतीय अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी आणि प्रमुख बँकांशी केलेल्या चर्चेत या विषयावर चर्चा झाली.
 
 
क्युबा हा भारताच्या जुन्या व्यापारी भागीदार देशांपैकी एक आहे. २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार दोन्ही देशांमधील व्यावापार हा २७ बिलियमन डॉलर्सहून अधिक आहे. यामध्ये भारतातून होणाऱ्या निर्यातीचा वाटा हा २६.५७ बिलियन डॉलर्स इतका आहे. तर भारत क्युबाकडून १ बिलियन डॉलर्स इतकी आयात करतो. प्रामुख्याने औषधे आणि त्यासाठी लागणार माल याचा या व्यापारामध्ये मोठा वाटा आहे. याशिवाय टेक्सटाईल्स, ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स, धातू उपकरणे, वैद्यकीय उपकरणे यांचा या व्यापारामध्ये समावेश होतो. यामुळे भारतासाठी उत्तर अमेरिका खंडातील प्रमुख व्यापारी भागीदार देशांमध्ये क्युबाचा समावेश होतो.
 
 
जुलै २०२२ मध्ये भारतीय चलन रुपयाला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे चलन म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रयत्न सुरु केले होते. त्यादृष्टीने योजना आखण्यासही सुरुवात केली होती. आता पर्यंत जगातील प्रमुख २३ देशांशी भारताचा रुपयांत व्यापार केला जातो. यामध्ये ओमान, इंडोनेशिया, कतार, श्रीलांका, सिंगापूर यांसारख्या महत्वाच्या देशांशी भारताचा व्यापार हा रुपयांमध्ये होतो. तसेच भारताच्या आयातीतील सर्वात मोठा वाट हा खनिज तेल आयातीचा आहे. यावरील खर्च कमी करण्यासाठी भारताचा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियाशीही रुपयांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी भारत आणि सौदी अरेबियामध्ये वाटाघाटी सुरु आहेत. भारताचा आशियातील सर्वात मोठा स्पर्धक असलेल्या चीनच्या अरेरावीला उत्तर देण्यासाठी भारताच्या प्रयत्नानांचा हा भाग आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0