हिंदू राष्ट्र सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संजय अडोळे

    02-Sep-2022
Total Views | 80
sanjay adole
 
 
 
नगर - हिंदू राष्ट्र सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संजय अडोळे यांची निवड करण्यात आली. सावेडीतील संजोग लॉन येथे झालेल्या राष्ट्रनिर्माण संकल्प सभेमध्ये हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांनी अडोळे यांच्या नावाची घोषणा करत पत्र देण्यात आले. अडोळे हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच हनुमान भक्त म्हणून सर्वज्ञात आहेत. हिंदूराष्ट्र सेनेची शहरात व जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. मागील वर्षी देसाई यांनी सर्व कार्यकारणी बरखास्त करण्याची घोषणा केली होती. तब्बल एक वर्षांनी जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे.
 
यावेळी बोलताना देसाई यांनी संघटनेच्या पुढील राजकीय भूमिकेचे संकेत दिले असून येत्या काळात जिल्ह्यात व शहरात संघटन बळकट करून निवडणूकींना सामोरे जाण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शहरातील राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार असून मधल्या काळात विखूरलेले संघटन पुनर्बंधनी करण्याचे आव्हान अडोळे यांच्यासमोर असेल समोर असेल.
 
कोरीपाटी असणारे अध्यक्ष देऊन देसाई यांनी संघटनेचा चेहरा मोहरा बदल्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचे जिल्हाभर बोलले जात आहे. कट्टर हिंदुत्ववाद जोपसणारी आक्रमक संगठन ही ओळख कायम ठेवून सर्व समावेशक राजकीय पर्याय देण्याची किमया अडोळे साधणार का हे येत्या काळात पाहावे लागेल.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा