आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. सोनेरी किनार असलेला शिक्का छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार मधील नौदलापासून प्रेरणा घेतलेला जाणवतो. अमृत महोत्सवी काळात २ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय नौसेनेची ही नवी ओळख झाली आहे. विद्यमान केंद्र सरकारने केलेला हा बदल स्वागतार्ह असाच आहे.
शं नो वरुणः म्हणजे काय? -
शं नो वरुणः म्हणजे पाण्याची देवता वरुण आपल्यासाठी शुभ होवो. हे भारतीय नौदलाच्या पराक्रमाचेही प्रतीक आहे. हे तैत्तिरीय उपनिषदातील प्रार्थनेतून घेतले आहे जे खालीलप्रमाणे आहे:-
ॐ शं नो मित्रः शं वरुणः । शं नो भवत्वर्यमा । शं नो इन्द्रो बृहस्पतिः । शं नो विष्णुरुरुक्रमः । नमो ब्रह्मणे । नमस्ते वायो । त्वमेव प्रत्यक्षं बह्मासि । त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि । ऋतं वदिष्यामि । सत्यं वदिष्यामि । तन्मामवतु । तद्वक्तारमवतु । अवतु माम । अवतु वक्तारम् ।।
ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ।
अर्थात वरूण देवता आमच्यावर सदैव प्रसन्न राहो 'अर्यमा' अर्थात हे सुर्यदेवता आम्हांला आशीर्वाद दे. इंद्र आणि बृहस्पति आपल्यासाठी हितकारक होवोत. 'उरुक्रम' (मोठ्या पावलांचा) विष्णू आपल्यावर कृपा करो. मी ब्रह्मदेवाला नमस्कार करतो. वायुदेव तुला नमस्कार असो. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. म्हणून मी तुला थेट ब्रह्मा म्हणेन. (ऋत ही सत्याची व्यापक कल्पना आहे.) मी खरे बोलेन, मी खरे सांगेन, ब्रह्मदेव माझे रक्षण करो. त्याने वक्त्याचे रक्षण करावे, आचार्यांचे रक्षण करावे, माझे रक्षण करावे.
सर्वेश फडणवीस