कुनो उद्यानात राहू शकतात २०-२५ चित्ते!

19 Sep 2022 18:40:37
चितः
 
 
 
भोपाळ cheetah in India : भारतातील आफ्रिकन चित्त्यांचे नवीन घर असलेल्या मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये २० ते २५ चित्त्याना राहण्यासाठी पुरेशी जागा आणि पुरेसा शिकार साठा असल्याचे एका वन अधिकाऱ्याने सांगितले आहे. ज्या अभयारण्याचे नाव कुठेच नव्हते, ते आज जागतिक बातम्यांचे केंद्र बनले आहे. नामिबियातून आणलेले आठ चित्ता - पाच मादी आणि तीन नर १७ सप्टेंबर रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये मोठ्या धूमधडाक्यात सोडण्यात आले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातील तीन चित्त्याना उद्यानातील एका विशेष बंदिस्तात सोडले. (cheetah in India)



 
भारताच्या नकाशा वरून ७० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्ता या प्राण्याचा आफ्रिकन नातेवाईक असलेला आफ्रिकन चित्ता भारतात आणण्यात आला आहे. चीता पुनर्परिचय कार्यक्रमाशी जवळून संबंधित असलेले मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) जे.एस. चौहान यांनी विश्वास व्यक्त केला की ही योजना खूप यशस्वी होईल. पन्ना व्याघ्र प्रकल्पाचे उदाहरण पुढे करत ते म्हणाले कि एकही वाघ नसलेल्या भागात मध्यप्रदेश वनविभागाने वाघांचे वास्तव्य यशस्वी करून दाखवले.



वेदातील पर्यावरणीय विचार 


नामिबियातून ८ चित्ते आणल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणखीन १२ चित्ते आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवतालची झाडी मध्यप्रदेशच्या शिवपुरी आणि शेओपूर जिल्ह्यापासून ते राजस्थानच्या बारन जिल्ह्यापर्यंत ६ हजार चौरस किलोमीटर जंगल क्षेत्रापर्यंत पसरलेली आहे. असा दावा त्यांनी केला. चंबळ नदीचा मुक्तप्रवाह असल्यामुळे राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये असल्यामुळे हे चित्ते रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात जाणार नाहीत असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच बंदिस्त क्षेत्रात चित्ते असल्यामुळे ते सुरक्षित आहेत, तथा 'चीता मित्रां'च्या मदतीने मानव प्राणी संघर्ष कमी करण्यास मदत होणार आहे. (cheetah in India)


Powered By Sangraha 9.0