नवी दिल्ली : कोरोनाच्या महाभयंकर झटक्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळ्या झालेल्या असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र सुस्थितीत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हरवल्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत, एवढेच नव्हे तर सर्वच घटकांची जोरदार घौडदौड सुरु झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अजून एक मोठी चांगली बातमी मिळाली आहे. गेल्या तिमाही मध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये थेट करांमधून येणाऱ्या उत्पन्नात तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. थेट करांमधून येणारे उत्पन्न तब्बल ८ .३६ लाख कोटींवर गेले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे सुचिन्हच म्हणावे लागेल.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सर्वच राज्य सरकारांना थेट करंटेल परतावा देऊनही तब्बल ७ लाख कोटी एवढे उत्पन्न मिळणार आहे. २०२२- २३ या आर्थिक वर्षातील हे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी अधिक आहे. थेट कारांमधील वाढ ही कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रतीक मानेल जाते. भारतीय अर्थव्यवस्थेतील थेट करांमधून येणारे उत्पन्न वाढणे हे भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने पूर्वपदावर येत आहे याचेच लक्षण आहे. भारत सरकारने अंमलात आणलेल्या योजनांचेच हे यश म्हणावे लागेल. कर आकारणी आणि करभरणा यात जास्तीत जास्त सुलभता आल्यानेच हे शक्य झाले आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
थेट करांमध्ये प्रामुख्याने आयकर, मालमत्ता कर, मुद्रांक शुल्क यांचा समावेश असतो. यातील वाढ ही सर्वसामान्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे थेट निदर्शक आहे. त्यामुळे भारतीयांच्या उत्पन्नांत वाढ होत आहे हे यातून सिद्ध होत आहे. आताच्या उत्पन्नात कॉर्पोरेट आयकराचा वाटा ४.३६ लाख कोटी तर व्यक्तिगत आयकराचा वाटा हा ३.९८ लाख कोटी इतका आहे. कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे. यातूनच कोरोना कालीन मरगळ झटकून भारत प्रगती करतोय हे दिसत आहे.