पुण्यात काँग्रेसचे स्वबळावर लढण्याचे संकेत! आघाडीतील मित्र पक्षाना चकवा

18 Sep 2022 17:57:23

congress
 
 
पुणे: रविवारी पार पडलेल्या पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाने आगामी पुणे महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गेली अडीच वर्षे सत्तेत एकत्र राहून भविष्यात देखील एकी कायम ठेवण्याच्या या पक्षांना काँग्रेसच्या भूमिकेमुळे धक्का बसला आहे आणि काँग्रेसने हा चकवा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काँग्रेस भवन येथे ही बैठक पार पडली. बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी, अशी सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. दरम्यान, येणार्‍या महापालिका निवडणुकासाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
 
 
 
कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणीमुळे येणारी महानगरपालिकेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. त्याबरोबर निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी अशा सूचनाही देण्यात आल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0