दौलताबाद किल्ल्याचं नाव पुन्हा देवगिरी किल्ला करणार!
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
17-Sep-2022
Total Views |
संभाजीनगर, दि १७ सप्टेंबर : दौलताबाद किल्ल्याचे नामकरण पुन्हा देवगिरी किल्ला करणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. शनिवारी दि १७ सप्टेंबर रोजी देवगिरी किल्ल्यावर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भारतमाता मंदिर मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोढा यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सामूहिक वंदे मातरम आणि भारतमातेची आरती करण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, या किल्ल्याचे नाव देवगिरीचं आहे मात्र आधीदेखील हे नाव देवगिरी किल्ला झालं पाहिजे. यासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि जिल्हाधिकारी यांनीदेखील पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. संभाजीनगरमधील देवगिरी किल्ल्याकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने दि. १७ सप्टेंबर रोजी देवगिरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, देवजीभाई पटेल आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केल्यानंतर आता दौलताबाद येथील किल्याचे कागदोपत्री नामांतर देवगिरी किल्ला करण्याची घोषणा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. मागील अनेक वर्षांपासून संभाजीनगरमध्ये सातत्याने मुघलकालीन प्रतीकांचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढाही कायम याच स्थळांकडे असल्याचे दिसून आला. ऐतिहासिक वारसा सांगणार्या अनेक वास्तू तसेच देवस्थाने संभाजीनगरमध्ये आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या गड-किल्ल्यांचे महत्त्व जगभरात पोहोचवण्यासाठी आगामी काळातही मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात राज्याचा पर्यटन विभाग विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत संभाजीनगरमधील देवगिरी किल्ल्यावर पर्यटन विभागाकडून स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार सोहळा व पोवाडा गायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करण्यात आले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.