मुंबई : भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या 'मिशन ४५' अभियानाअंतर्गत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. शनिवारी अनुराग ठाकूर यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सायन सर्कल येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याच भेटीदरम्यान, चेंबूरच्या गांधी मैदानात त्यांनी क्रिकेटचा सामन्याचा आस्वाद घेतला. यावेळी ठाकूर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार तसेच भाजप आमदार कालिदास कोळंबकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.