स्वकर्तृत्व नसलेले आता आम्हाला जाब विचारताहेत : फडणवीस

16 Sep 2022 18:05:55

deve
Devendra Fadnavis


मुंबई 
: Devendra Fadnavis :  वेदांता फॉक्सकॉन प्रश्नी माजी मंत्री आदित्य ठाकरेंपासून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी केलेल्या सर्वच वक्तव्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चोख समाचार घेतला. लघु उद्योग भारती, महाराष्ट्रच्या मुंबई अधिवेशनात ते बोलत होते. आमचं सरकार आलं त्यावेळेस व्यवहाराची जवळपास सर्वच बोलणी अंतिम टप्प्यात आली होती. ज्यांनी स्वतः काही केलं नाही, ते आत्ता आमच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. आमच्याकडे बोटं दाखवित आहेत. अरे तुमचं कर्तृत्व काय ते सांगा ना?, असा खणखणीत सवाल त्यांनी महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन फडणवीस-शिंदे सरकारमुळे निसटला, अशी टीका करणाऱ्यांना विचारला आहे.

"२०१४ ते २०१९ च्या काळात कुठल्याही एकही कंपनीला एक पैसा द्यावा लागला नव्हता. फॉक्सकॉन प्रकरणात ज्या तीन एक पत्रकारांनी हे नरेटीव्ह सेट केलं की महाराष्ट्रातून उद्योग निसटला, त्याला स्वतः अनिल अग्रवाल यांनी याबद्दल वस्तुस्थिती मांडून याबद्दलचं सत्य सांगितलं.", असेही ते म्हणाले. 

वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून कुणामुळे निसटला देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण भाषण






Powered By Sangraha 9.0