प्रकाश पाटील यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती

    16-Sep-2022
Total Views |
 
मुंबई : ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख  प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री 3 वाजता त्यांना  याबाबतचे नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले. 
प्रकाश पाटील हे गेली 12 वर्षे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी कार्यरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असलेल्या गोपीनाथ पाटील पारसिक बँकेच्या उपाध्यक्षपदी देखील पाटील कार्यरत आहेत. त्यांच्या संघटन कौश्यल्याचा नक्कीच पक्ष संघटनेसाठी राज्यभर नक्कीच उपयोग होईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
यांच्यासह बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते वामन म्हात्रे यांची देखील बदलापूर शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा बदलापूर अंबरनाथ परिसरात शिवसेनेला अधिक बळ देण्यासाठी नक्कीच होईल अशी अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हेदेखील उपस्थित होते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.