यवतमाळ : शिवसेनेनच्या वाशीम - यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याचे शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आली. शिंदे गटाच्या लोकसभानेते पदी त्यांची या आधीच नियुक्ती झाली आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी मोठी असून त्या जबाबदारीला साजेसे असे काम आपण करू" अशी ग्वाही भावना गवळी यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या जबाबदारीसाठी त्यांचे आभार देखील त्यांनी मानले आहेत.
शिवसेनेच्या कार्यकर्त्या ते शिवसेना नेत्या असा आपला प्रवास आहे. आपण शिवसेनेसाठी तळागाळात जाऊन काम केले आहे. यापुढेही तसेच काम करत राहू आणि मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू असे वक्तव्य भावना यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर भावना गवळी या शिंदे गटात सामील झाल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून त्यांची हकालपट्टी केली गेली होती. त्यांनाही गद्दार असे संबोधले गेले होते. आपण इतकी वर्षे संघटनेत काम केले तरीही आपली अशी होणारी संभावना ही खुप दुःखदायक आहे अशी प्रतिक्रया भावना गवळी यांनी दिली होती.