नवी दिल्ली ,विशेष प्रतिनिधी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपने मंगळवारी कोलकाता येथे सचिवालयावर मोठा मोर्चा काढला. या मोर्चाविरोधात पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चास अडविले. यावेळी प. बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चटर्जी यांच्यासह अनेक भाजप नेते व कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपने आक्रमक आंदोलनास प्रारंभ केला आहे. याअंतर्गत भाजपने मंगळवारी सचिवालयावर मोर्चाचो आयोजन केले होते. याअंतर्गत भाजपने सचिवालयाला तीन बाजूंनी घेराव घालण्याची योजना आखली होती.
हावडा रेल्वे स्थानकातून सुकांतो मजुमदारमात्र तिघांनाही पोलिसांनी अडवले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पहावयास मिळाले. पोलिसांनी यावेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चटर्जी यांच्यासह असंख्य नेते व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. , संत्रागाची येथून शुभेंदू अधिकारी आणि दिलीप घोष हे सचिवालयात जाणार होते,
पोलिसांना मोर्चा दडपण्यासाठी केलेल्या कारवाईचा सुवेंदू अधिकारी यांनी निषेध केला. ते म्हणाले, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्याविरोधात राज्यातील जनता आता त्रस्त झाली असून त्या आता प. बंगालमध्ये उत्तर कोरियाप्रमाणे हुकूमशाही सुरू केली असल्याचा टोला अधिकारी यांनी लगाविला आहे.