'चार दिवसांनी मी स्वतः देईन उत्तर' - सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव करणार बिग बॉस ४ चे सूत्रसंचालन?

    06-Aug-2022
Total Views | 33

bigboss
 
 
 
मुंबई : बिग बॉस हा शो फक्त हिंदीतच नाही तर मराठीतही तेवढाच गाजला. हिंदीत सलमाननं तर मराठीत महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालन करून शोला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. लवकरच आता बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतु या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजेरकर करणार नाहीत अशी चर्चा रंगली, अन् यंदाच्या सिझनचे सूत्रसंचालन करण्यासाठी नाव समोर आले ते सिद्धार्थ जाधव याचे. गेले अनेक दिवस फक्त सिद्धार्थच्या नावाची चर्चा सुरु होती; पण आता स्वतः सिद्धार्थनं मीडियाशी बोलताना या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे.
 
 
 
दोन वर्षांच्या जगबंदी नंतर आता पुन्हा थिएटरमध्ये सिनेमे रिलीज व्हायला लागले आहेत. सिद्धार्थही परत एकदा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम करताना दिसतोय. 'तमाशा लाईव्ह' या म्युझिकल सिनेमानंतर आता सिद्धार्थ सुपरहिट 'दे धक्का'च्या सीक्वेलच्या माध्यमातून समोर आला आहे. दे धक्का सिनेमाला समिक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत.
 
 
बिग बॉस मराठी ४ चे सूत्रसंचालन तू करणार अशी चर्चा सुरू आहे, तूच याचे निवेदन करणार का? हा प्रश्न सिद्धार्थ जाधवला विचारला तेव्हा तो म्हणाला, ''अनेक दिवसांनी सिद्धार्थ जाधव हे नाव चर्चेत आहे तर होऊ देत चर्चा,मला आवडत आहे. मी आत्ताच उत्तर दिले तर तुमच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळेल, ही उत्सुकता अशीच ठेवा, थोडा धीर धरा. चार दिवसांनी मी स्वतः याचे उत्तर देईन.''
 
 
तर याच संदर्भात कलर्स मराठीच्या टीमने फक्त एक मोठा पॉझ घेत हसले आहेत. त्यामुळे नेमके सूत्रसंचालन कोण करणार आहे, हे चार दिवसांनीच समजणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121