आता पाळी परबांच्या 'ट्वीन' बंगल्यांची!

28 Aug 2022 16:51:27
parab
 
 
 
मुंबई : बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी यांच्या संगनमताने उभे राहिलेले भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेले ट्वीन टॉवर्स रविवारी दुपारी जमीनदोस्त करण्यात आले. याच घटनेचा धागा पकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे टॉवर्स तर पडले आत पाळी अनिल परबांच्या ट्वीन टॉवर्सची असा खोचक टोला लगावला आहे. अनिल परबांच्या दापोलीच्या साई रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या अजून एका भ्रष्टाचारी नेत्याला दणका मिळणार आहे.
 
 
 
 
 
अनिल परब यांनी दापोलीजवळील मुरुड येथे बेकायदेशीररित्या रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आले आहे. भाजपनेते किरीट सोमय्या यांनी याविरोधात जोरदार मोहीम उघडून दापोली येथे जाऊन त्याविरोधात आंदोलन केले होते. सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन सोमय्यांनी अनिल परबांच्या या भ्रष्टाचाराला वाचा फोडली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांना अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडीच्या संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर आता नंबर अनिल परबांचा असल्याची शक्यता आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0