गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात, आपल्या सर्वांनाच हे जाणवले असेलच की, बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा आपल्याला निसर्गाचा आशीर्वाद लाभणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना जणू निसर्गाने दिलेली धोक्याची सूचनाच होती. आरोग्यविषक चिंता वाढत असताना आणि ‘कोविड-19’ चा सर्रास होणारा प्रसार सरते शेवटी नियंत्रणात आणला जात असताना, आपला देश गणेश चतुर्थीचा, सगळ्यांच्या आवडीचा असा सण साजरा करण्यास सज्ज होत आहे. पण, महामारीच्या माध्यमातून आपण सगळे आपल्या या कठीण काळापासून काही शिकलो आहोत का? याचाच ऊहापोह करणारा हा लेख...
आपण आपला सण साजरा करण्यासाठी आपल्या देवाची मनःपूर्वक पूजा करण्यासाठी आणि तरीही जमेल, तसे आणि जमेल तितके पर्यावरणासाठी योगदान देण्याची हीच वेळ आहे. आता तुमच्या मनात येऊ शकते की, श्रद्धेचा, देवाचा, आपण आपला सण साजरा करण्याचा आणि निसर्गाचे होणारे नुकसान ङ्माचा का संबंध? चला, तर काही गोष्टींकडे तुमचे लक्ष केंद्रित करूया आणि चिंता नको बरं, काही उपादेखील आपण नक्कीच बघूया.
गणेश चतुर्थीपासून सणासुदीच्या दिवसांना गती मिळते. भव्य आणि आकर्षक देखाव्यांचे व जल्लोषात जाणार्या मिरवणुकींचे आपण साक्षीदार होऊ लागतो. सार्वजनिक मंडळांच्या भव्यमूर्ती आणि देखाव्यांपासून ते घरातील लहान मोठ्या मुर्त्यांपर्यंत, जणू दहा दिवस अख्खे शहर बाप्पाच्या नावाने दुमदुमत असते. अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत, ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ हे शब्द ऐकू येत असतात. पण मग ते दिवस संपल्यानंतर, आनंद संपतो? उत्सव पूर्ण होतो, जनलोक आपापल्या दैनंदिन जीवनात रुजू होतात. सगळं सामान्य होते, पण पर्यावरण बदललेले असते. पर्यावरणाचा र्हास झालेला असतो.

बर्याचशा लहान-मोठ्या ङ्कूर्ती आणि मंडळांच्या अंदाजे सगळ्याच मूर्ती, आजही ‘पीओपी’ अर्थात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’, प्लास्टिक आणि सिमेंटचा वापर करून बनवल्या जातात. मूर्तींच्या रंगरंगोटी आणि सुशोभनासाठी ‘टॉक्सिक’ अर्थात विषजन्य रंग, प्लास्टिक आणि थर्माकॉलची सजावट सर्रास वापरली जाते. तसेच, भयंकर प्रमाणात खरी आणि खोटी फुलं वापरली जातात, ज्याने निर्माण होते विपुल प्रमाणात निर्माल्य. ङ्मा ‘पीओपी’मध्ये, ‘कॅल्शिम सल्फेट हेमिहाङ्मड्रेट’ नावाचे रसान असते, ज्याचे नैसर्गिक विघटन व्हाला अनेक वर्षे लागतात. हे रसान पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते, ज्याने जलचर आणि मासे मृत्यूमुखी पडतात. बाणगंगासारख्या बंदिस्त तलावांमध्ये, मासे अचानक मराचे कारण बर्याचदा हाच कमी होणारा पाण्यातला प्राणवायू असतो. न विरघळणार्या या मूर्ती, तलावात, तसेच छोट्या नद्यांमधून मोठ्या नद्यांमध्ये व तिथून समुद्रात प्रवेश करतात आणि आपल्या या मार्गात निसर्गाचा विनाश पेरत जातात. काही भव्य ङ्कूर्तींनी होणारा र्हास हा १०० वर्षांहून अधिक काळ प्रदूषणाचे कारण होऊ शकतो.
तशीच, जितकी रंगीबेरंगी आणि चमकदार मूर्ती आणि देखावा, तितके जास्त विषारी आणि हानिकारक पदार्थांच वापर ङ्मात आहे, असे गृहित धरणे चूक नाही. यात शीस, पारा व कॅल्शिम सारखे जडधातू आढळतात. ङ्मांचा पाण्याशी संपर्क होताच, पाण्याची आम्लता वाढते आणि हे परत जलचरांसाठी विनाशकारी ठरते. त्याहून, हे धातू जैव-विस्तृतीकरण (biomagnification)) आणि जैवसंच ((bioaccumulation) या प्रक्रियेद्वारे आपल्या अन्नाचा भाग बनून, आपल्या आरोग्याला धोका निर्माण करतात. जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो तसेच त्वचेच्या रोगांचे प्रमाण वाढते, असे संशोधनातून आढळते. बर्याचदा, फक्त मूर्तीचे विसर्जनदेखील केले जात नाही. त्यासोबत रंग तर आलाच, पण, धातूचे दागिने किंवा प्लास्टिकच्या गोष्टी, आणि निर्माल्य विसर्जित केले जाते, ज्याने प्रदूषण कित्येक पटीने वाढते. प्लास्टिकची प्रदूषक म्हणून भूमिका का आहे, हे सर्वश्रुत आहे, त्यावर अजून का बोलाचं? पण हे धातूचे दागिनेदेखील प्रदूषकच आहेत. निर्मल्यातून पाण्यात पोहोचते ते कीटकनाशक आणि खत. कुजलेली फुलं, ही रसाने, ङ्मा सगळ्याचं गोष्टी माशांसाठी तसेच इतर जलचरांसाठी, जवळच्या झाडांसाठी आणि ङ्मा संपूर्ण प्रणालीवर अवलंबून असलेल्या आपल्या सारख्या इतर प्राण्यांसाठी काळ बनतात.
हे झालं पाण्याबद्दल, पण सणाच्या दिवसांमध्ये होणारी आतषबाजी हेच वायू प्रदूषणाचे मुख्य कारण बनते. गेल्या काही वर्षात, गणपती, पाडवा तसेच दिवाळी, या नंतर तापमानात अचानक होणारी वाढ,याच वायुप्रदूषणाचे प्रमाण आहे. ङ्मात बेरिम, कॅडमिम, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड व नाङ्मट्रेट्स आणि सुल्फेट्स सारख्या घातक रसानांचे वातावरणात प्रमाण वाढते. Respirable suspended particulate matter (RSPM)ची पातळी वाढते आणि अस्थाम्याच्ङ्मा घटना वाढू लागतात. आणि फक्त वायुप्रदूषण नाही, तर ध्वनिप्रदूषण, हादेखील महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. तुम्हाला ठाऊक असेलच पण, ध्वनिप्रदूषणदेखील अनेक आजारांचे कारण असते. अगदी तात्पुरता बहिरेपणा असो, अर्धशिशी, डोकेदुखीपासून अनेक मानसिक आजार आणि काही चिंताजनक आजारांचेदेखील ध्वनिप्रदूषण कारण बनू शकते. तर विचार करा, रस्त्यावर राहणार्या कुत्र्या-मांजरांचे का होत असेल? तसेच उदाहरण द्याचं झालं तर, सजावटीसाठी सर्रास वापरली जाणारी मोराची पिसे, ही खरंच गळलेली पिसे आहेत? का त्याला मारून काढलेली? यांचा आपण विचार करतो का?
या व अशा अनेक कारणांसाठी, गणेश चतुर्थीसारख्या पावन सणाचे पर्यावरणी प्रभाव समजणेदेखील महत्त्वाचे आहे. तर आपण का करू शकतो? अगदी काही सोपे बदल आहेत. पण या बदलांनी पर्यावरणाचा नाश थांबवता येऊ शकतो. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल, अर्थात ‘पीओपी’च्या ङ्कूर्ती न बनवणे. शाडूच्या मातीचा वापर मूर्ती बनवण्यासाठी प्राचीन काळापासून सर्वश्रुत आहे आणि तोच पर्यावरणाला पोषकदेखील आहे. पण नजीकच्या काळात काही नवनवीन आणि अनोखे पर्या मूर्ती बनवण्यासाठी उपलब्ध आहेत बरं का. पेपर आणि पेपर पल्पची मूर्ती किंवा क्लेचा वापर करून बनवलेली मूर्ती पर्यावरणपूरक असते. एक नवीन पर्या म्हणजे शाडूची मूर्ती, ज्यात आपल्या आवडीच्या झाडाच्या बिया असतात. विसर्जनाच्या दिवशी या मूर्तीला बागेत खड्डा खणून पुरता येते व नीट काळजी घेतली की इथेच आपल्या आवडीचे नवे झाडदेखील येते. अगदीच असे काहीही नाही केले तरी कामस्वरूपी धातूची मूर्ती वापरणे हे तर सगळ्यांनाच शक्य होऊ शकेल ना? प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे, सोप्प्या व पर्यावरणासाठी घातक नसलेल्या गोष्टींचा वापर करणे सगळ्यांनाच शक्य आहे. आतषबाजीपेक्षा मधुर संगीताचा आनंद घेणे, चांगलंचुंगलं खाणे व कर्णविकारी ध्वनिप्रदूषण न करणे सगळ्यांनाच शक्य आहे.
आणि अजूनही कुणाला संश असेल की पर्यावरणाची काळजी का करावी, तर या शेवटच्या घटनेचा विचार करा. दहा दिवस ज्या मूर्ती भोवती आयुष्य फिरते, त्याच बाप्पाचे दुभंगलेले शरीर, अर्धे वाळूत रुतलेले,आपल्याला कुणीतरी खरे विसर्जन प्रदान करेल का? या प्रतीक्षेत बघणे, इतकं तरी आपण कलियुगात वाया जाऊ नये, असे मनापासून वाटते. ज्या दैवताची प्रार्थना संकटमोचक म्हणून करावी त्यानेच पर्यावरणी संकट यावे, हे तरी आपण भक्त म्हणून थांबवू शकतो का? हाच प्रश्न आहे.