'आता' उद्धव ठाकरे निघाले यात्रेला!

21 Aug 2022 18:30:45
thakre
 
 
मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना, उद्धव ठाकरेंनीही महाराष्ट्र फिरण्यासाठी कंबर कसली आहे. गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेवर निघणार आहेत.आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा जिथे जिथे जात आहे तेथील शिवसैनिक हे यात्रेनंतर शिंदे गटात सामील होत असल्याने आता नवीन काय होणार याची आता उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यातूनच त्यांच्या या यात्रेची सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंद दिघेंच्या टेंभी नाक्यावरच उद्धव ठाकरेंची पहिली सभा होणार आहे.
 
 
या यात्रेच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी उद्धव यांच्या सोबत असताना शिंदे गट जे ओरडून ओरडून सांगत होता, ते गेल्यावर त्या गोष्टी आता ठाकरे पिता -पुत्रांनी सुरु केल्या आहेत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचे उलटेच परिणाम दिसत असल्याने आता उद्धव ठाकरेंची यात्रा काय परिणाम साधते हेच आत बघावे लागेल. महाराष्ट्रातील लोकसभेचे सर्व ४८ मतदारसंघ फिरून झाल्यानंतर कोल्हापुरातील बिंदू चौकात या यात्रेचा समारोप होणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0