"कम्पाऊंडरकडून औषधं घेतो म्हणणाऱ्या राऊतांवर डॉक्टरकडे जाण्याची वेळ"

भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णींची प्रतिक्रीया

    01-Aug-2022
Total Views |
 

raut
 
 
 
मुंबई : पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या खासदार संजय राऊत यांना तपासणीसाठी जे.जे. रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. यानिमित्ताने भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णींनी राऊतांना टोला लगावला आहे. "माणुस कितीही मोठा असला तरी त्याने आपल्या वाणीवर ताबा ठेवायला हवा. कारण नियतीचा खेळ कुणाला सोडत नाही.
 
 
मी डॉक्टरकडे जात नाही, त्यापेक्षा कंम्पाउंडर बरा अस म्हणण्याऱ्या राउताना जेजे रुग्णालयात डॉकटरकडे जाव लागत.", असेही ते म्हणाले.
राऊतांना सकाळी ९ वाजता जे.जे. रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले जाणार होते. मात्र, पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे दुपारी ही तपासणी करण्यात येत आहे. पत्रा चाळ प्रकरणात ईडी आता संजय राऊतांना ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याबद्दल निर्णय लागणार आहे. जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर जामीन प्रक्रीयेसाठी राऊतांचे वकिल अर्ज करू शकतात.
 
 
दरम्यान, या प्रकरणात ईडी कार्यालयातून जे.जे. रुग्णालयात जाईपर्यंत राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत आणि समर्थकांची घोषणाबाजी केली होती.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.