मुंबई : ठाकरे घराण्याचे वंशज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. २९ जुलै) मुख्यमंत्री एकनाश शिंदेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदेगटाला पाठींबा देण्याचा मोठा निर्णय घेतला असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय कारकीर्द सुरु करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निहार ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे थोरले सुपुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव. मंगळवार, दि. २९ जुलै रोजी बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनंतर आता निहार ठाकरे यांनी घेतलेल्या भेटीमुळे शिवसेना थेट घरातूनच फुटताना दिसत आहे.
एकीकडे सत्ता हातात असताना कधी बाहेर न पडलेल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेनेला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. जनसामान्यांत फिरून लोकांचा पाठींबा टिकवण्यासाठी निष्ठायात्रा काढत आहेत. मात्र एका कट्टर शिवसैनिकाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं अशी बाळासाहेबांची इच्छा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळे ठाकरेंच्या घरातच खिंडार पडल्याची परिस्थिती आता उद्भवली आहे, असे दिसत आहे.