मुंबई : आज शिवसेनेत माझ्या लढवय्या साथी आल्या आहेत अशा शब्दांत ज्यांचे कौतुक करत उद्धव ठाकरेंनी ज्या सुषमा अंधारेंचे कौतुक केले होते, त्या त्याच सुषमा अंधारे आहेत ज्यांनी २०१९च्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंचा बाप काढला होता.
हिंदू देवी- देवतांची, प्रथा, परंपरांची येथेच्छ खिल्ली उडवणाऱ्या, सुषमा यांनी आता संविधान वाचवण्यासाठी, संविधानिक संस्था वाचवण्यासाठी, शिवसेनेत प्रवेश करत, शिवबंधन बांधले आहे.उठता बसता, हिंदुत्वाचा जयजयकार करणाऱ्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे शेंडी, जानव्याचे हिंदुत्व नाही म्हणून माझ्यासारखी पुरोगामी विचारांची बाई शिवसेनेत आली असे सुषमा यांनी आपल्या प्रवेश करताना सांगितले.
चांदा ते बांदा शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी आणि शिवसेना वाढवण्यासाठी मी आता लढणार आहे असे सुषमा यांनी सांगितले आहे.राष्ट्रवादीच्या स्टार्ट प्रचारक म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप वर येथेच्छ तोंडसुख घेतले होते.
महाराष्ट्रातील सर्वच पुरोगामी संस्थांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा येत आहेत असा दावा करत मुस्लिम संघटनांकडूनही उद्धव ठाकरेंच्या कामयाबीसाठी अल्ला तालाकडे दुआ मागितली जात आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.