मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार!

28 Jul 2022 17:49:46

local
 
 
 
मुंबई: मुंबईतील एसी लोकलची लोकप्रियता पाहता मध्य रेल्वेवर अजून १० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साध्या लोकलच्या १० फेऱ्या रद्द करुन त्यावेळेत एसी लोकल चालवल्या जाणार आहे. या लोकलच्या फेऱ्या सकाळी आणि सायकाळी गर्दीच्या वेळी चालवण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वे कडून सांगण्यात आले.
  
सध्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळादरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. मध्य रेल्वेवर दररोज एसी लोकलच्या ५६ फेऱ्या होतात. यात लवकरच आणखी दहा एसी लोकलच्या फेऱ्यांची वाढ होईल. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या ५६ वरून ६६ फेऱ्या होतील. साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द केल्यावरच नवीन फेऱ्या वाढविणे शक्य असल्याने साध्या लोकल फेऱ्या रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.
 
या मार्गांवर एसी लोकल फेऱ्या वाढवणार
 
सीएसएमटी– बदलापूर ( ४ फेऱ्या )
 
सीएसएमटी-ठाणे मार्गावर ( ४ फेऱ्या )
 
सीएसएमटी-कल्याण मार्गावर – ( २ फेऱ्या )
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0