विमानतळावर बाजीप्रभूंना पाहिले अन्...

26 Jul 2022 12:55:52
 
ajaypurkar
 
 
 
पुणे : सध्या चित्रपटसृष्टीत एकापाठून एक ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. त्यात सर्वात गाजला तो म्हणजे 'पावनखिंड'. दिग्पाललांजेकर लिखित, दिग्दर्शित 'पावनखिंड'ने बॉक्स ऑफिसवर देखील सर्वात जास्त कमाई केली होती. या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती अभिनेते अजय पुरकर यांनी. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला होता. फक्त अजय पुरकर यांचीच नाही तर इतर सर्व व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने झाले असले तरी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ आजही दिसून येते.
 
 
 
 
बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांच्याबरोबर नुकतीच एक घटना घडली. ही घटना त्यांनी स्वतः आपल्या सोशल मिडियावरून सांगितली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे. यात झाले असे की, या चित्रपटातील कलाकार अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे एका सिनेमाच्या शूटिंगनिमित्ताने दुसऱ्या गावी जात होते. त्यासाठी त्यांची टीम पुणे विमानतळावर पोहोचली. तेव्हा तेथील टीव्हीवर त्यांचाच 'पावनखिंड' हा चित्रपट सुरु होता. दरम्यान बाजीप्रभू देशपांडेची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांना प्रत्यक्ष समोर पाहून विमानतळावरील मंडळी थक्क झाली. रील बाजीप्रभू देशपांडेंना समोर प्रत्यक्ष पाहून त्यांचे चाहते भारावून गेले .
 
 
 
View this post on Instagram

A post shared by Pradyot Prashant Pendharkar (@pradyotpp)

" />
निर्माते प्रद्योत पेंढारकर यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे, 'योगायोग... 'पावनखिंड चित्रपट टीव्हीवर चालू असतानाच आम्ही पुणे विमानतळावर पोहोचलो आणि प्रत्यक्ष बाजीप्रभुंना समोर पाहिल्यावर एअरपोर्टवर जी धांदल उडाली ती मजाच काही और!' यावेळी व्हिडिओमध्ये मागे स्क्रीनवर चित्रपटातील बाजीप्रभूंचा महत्वाचा सिन चालू आहे आणि पुढे अभिनेते अजय पुरकर उभे आहेत.
 
 
 
अजय पुरकर आणि टीमला एअरपोर्टवर अचानक पाहून कर्मचाऱ्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी या कलाकारांची खातिरदारी केली. या चित्रपटात अजय पुरकर यांच्यासोबतच चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर निर्मिती करत असलेल्या 'शिवराज अष्टक' या मालिकेतील 'पावनखिंड' हा तिसरा सिनेमा होता. त्या नंतर आलेला 'शेर शिवराज' या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती.
Powered By Sangraha 9.0