अक्कलकोट अपघातातील गंभीर जखमींना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत

24 Jul 2022 19:18:16

solapur
 

मुंबई : सोलापूर गाणगापूर बसला अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावर मोठा अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या घटनेची दाखल घेत जखमींच्या उपचारांची व्यवस्था तातडीने करण्याचे आदेश देत, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदतही जाहीर केली. सकाळी १०.३०च्या सुमारास मैंदर्गी रस्त्यावर एका शेताजवळ ही बस पलटी झाली. सुमारे ३५ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत.
 
 
 
 
 
या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एसटी प्रशासन आणि पोलीस यांनी मिळून प्रवाशांना सहकार्य करावे आणि प्रवाशांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून द्यावी असेही आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी जखमींची फोनवरून विचारपूस सुद्धा केली.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0