मुंबई(प्रतिनिधी): नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी असलेले आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात अतिरिक्त सचिव पदी नियुक्ती झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे पत्र भूषण गगराणीयांच्याकडे सुपूर्द केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदासोबतच नगर विकास विभाग, मराठी भाषा विभाग आणि जलसंपदा विभाग या पदांचे अतिरिक्त कार्यभारही डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री यांचे अपर सचिव पद हे रिक्त होते. आणि या पदाचा अतिरिक्त कार्यभार या पूर्वी आशिष कुमार सिंह यांचाकडे होता. हा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे डॉ. भूषण गगराणी यांना पत्राद्वारे सांगण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदासोबतच नगर विकास विभाग, मराठी भाषा विभाग आणि जलसंपदा विभाग या पदांचे अतिरिक्त कार्यभारही डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. भूषण गगराणी हे महाराष्ट्राच्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी होते.