मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. वर्धा जिल्ह्यातील शेडगाव येथील नाल्याला फडणवीसांनी भेट देऊन पुरस्थितीची पाहणी केली आणि पिकांच्या नुकसानीसंदर्भात स्थानिकांशी चर्चाही केली.
राज्य सरकारने तातडीने एनडीआरएफ आणि बचाव पथकांकडून चांगल्या पद्धतीने काम होत आहे आणि त्यांच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य नागरिकांना होत आहे तेव्हा त्यांचे प्रोत्साहन वाढवून त्यांचे काम होईल याकडे आपल्या सर्व यंत्रणांचे लक्ष असायला हवे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.