मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाची इंदौर- अमळनेर मार्गावरील बस सोमवारी सकाळी मध्यप्रदेशच्या नर्मदा नदीच्या पात्रात पडली. या अपघातात १२ मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरु आहे.
या अपघातातील १.चंद्रकांत एकनाथ पाटील – (४५) (चालक) अमळनेर २. प्रकाश श्रावण चौधरी (वाहक), अमळनेर ३.अविनाश संजय परदेशी, अमळनेर ४.राजू तुलसीराम (३५) राजस्थान, ५. जगन्नाथ जोशी -(६८) राजस्थान, ६. चेतन जागीड, राजस्थान ७. निंबाजी आनंदा पाटील, अमळनेर, ८. सैफउद्दीन अब्बास अली बोहरा, मध्यप्रदेश ९. कल्पना विकास पाटील – (५७) धुळे, १०. विकास सतीश बेहरे – (३३) धुळे, ११.आरवा मुर्तजा बोहरा – (२७) अकोला, १२. रुख्मणीबाई जोशी, राजस्थान अशी मृतांची नावे आहेत.
अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली आहे. अपघातात किती लोक असतील याबद्दलची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळाकडून १० लाख रूपये मदत देण्यात येणार आहे. तर रूग्णालयातील उपचारांसाठी दाखल जखमींवर उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहेत. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. एसटी महामंडळाकडून दुपारी दीड वाजता सदर माहिती देण्यात आली आहे.