स्पाईसजेट विमानाचे चाक न उघडल्यामुळे झाला उशीर!

12 Jul 2022 17:32:19
sj
 
 
 
मुंबई: स्पाईसजेटच्या दुबई-मदुराई विमानाला सोमवारी दि. ११ रोजी बोईंग बी७३७ मॅक्स विमानाच्या नाकाच्या चाकात बिघाड झाल्यामुळे उशीर झाला. या बाबतची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारची घटना गेल्या २५ दिवसांत स्पाइसजेट विमानात तांत्रिक बिघाडाची ९वी घटना आहे.

'डीजीसीए'ने १९ जूनपासून त्याच्या विमानात तांत्रिक बिघाडाच्या आठ घटनांनंतर स्पाइसजेटला दि. ६ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती . विमान वाहतूक नियामकाने म्हटले आहे की बजेट वाहक सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा स्थापित करण्यात "अयशस्वी" झाले आहे. विमान कंपनीने दुबई-मदुराई परतीचे विमान चालवण्यासाठी मुंबईहून दुबईला दुसरे विमान पाठवले. या प्रकरणाबद्दल विचारले असता, स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, "११ जुलै २०२२ रोजी दुबई ते मदुराईला जाणारे स्पाईसजेट एसजी२३ या विमानाला शेवटच्या क्षणी तांत्रिक समस्येमुळे उशीर झाला . पर्यायी विमानाची व्यवस्था तात्काळ करण्यात आली. "कोणत्याही विमान कंपनीला उड्डाण विलंब होऊ शकतो. या फ्लाइटमध्ये कोणतीही घटना किंवा सुरक्षेची भीती निर्माण झालेली नाही," असे प्रवक्त्याने नमूद केले.
Powered By Sangraha 9.0